मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरूर मतदार संघातील विकासकामांचा आढावा

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच राहणार

मौजे वढू-तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचे नाव ग्रामस्थांच्या मागणीनुसार पूर्वीप्रमाणेच 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ' करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अनुमती दिली. वढू-तुळापूर येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समाधीस्थळ विकासाच्या विविध मागण्यांचे त्यांना निवेदन दिले. 

शिरूर लोकसभा मतदार संघातातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. अनुपकुमार यादव, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय,सचिव (सुधारणा) शैला ए. यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी वढू-तुळापूर येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेऊन स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. ग्रामस्थांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन या समाधीस्थळाचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ करण्याची मागणी मान्य केली.