जिंतुर/प्रतिनी़धी

जिंतूर शहर हे जैन समाजाच्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून याठिकाणी जैन समाजाच्या वतीने महाविर मंदिर संस्थान पासून शाेभायात्रा महोत्सव निमित्त भव्य मिरवणूक दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र नेमगिरी पर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली  

मिरवणुकीची सुरवात श्री अमोल अशोक कुमारजी कळमकर यांच्या हस्ते करण्यात आली दर वर्षीप्रमाणे ही यात्रा महोत्सव व मिरवणूक तसेच अभिषेक पूजन व धार्मिक विधी व महाप्रसाद आयोजन करण्यात येत आहे या यात्रा महोत्सवास उपेन्द्रजी कोठेकर (नागपूर) अमोलजी खंदारे (मुंबई) प्रशांत सावजी कळमकर (अध्यक्ष सुंदरलालसावजी बँक)यांची प्रमुख उपस्थिती होती या याप्रसंगी नेमगिरी संस्थाध्यक्ष धन्यकुमार सावजी,विवेक विष्णूकुमार, शांतीकुमार सावजी,विरकुमार सावजी यांच्यासह जैन समाजाचे भाविक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते