औरंगाबाद: दि.१५स.(दीपक परेराव)दोन वर्षे कोरोना महामारीच्या संकटानंतर बांधकाम उद्योग भरारी घेतांना दिसतोय. कोरोनानंतर घराबाबतीतच्या संकल्पना पूर्णत: बदललेल्या आहेत. त्यासाठी औरंगाबाद आणि मराठवड्यातील बांधकाम व्यावसायिक सज्ज झालेले आहेत. त्यानिमित्ताने औरंगाबाद येथील शहानुर मिया दर्गा येथे असलेल्या जबिंदा मैदानावर २८ सेप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ दरम्यान मराठवाडास्तरीय दसरा: क्रेडाई ड्रीम होम एक्सपो – २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त क्रेडाईच्या रेल्वे स्टेशन रोडवरील मध्यवर्ती कार्यालयात पूर्वतयारी बैठक बुधवारी (ता. १४) पार पडली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्टॉलचा लकी ड्रॉ काढण्यात आले.
याबाबत बोलताना क्रेडाई अध्यक्ष नितीन बगडिया म्हणाले की, कोरोनानंतर मराठवाडा स्तरीय होणारे हे पहिलेच मोठे प्रदर्शन आहे. त्यामुळे मराठवड्यातील ग्राहक आणि बिल्डर यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. हे प्रदर्शन सुरू होण्यापूर्वीच मराठवड्यातील ग्राहकांमध्ये प्रदर्शनाबाबत चर्चा सुरू आहेत. या प्रदर्शनात बांधकाम व्यावसायिक, बांधकाम साहित्य, राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँक, खाद्य आणि मनोरंजन आदी मिळून १५० च्या आसपास स्टॉल असणार आहेत. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांना प्लॉट, फ्लॅट, रो हाऊस, बंगला यांसारख्या घरे विकत घेण्याची, तर बांधकाम व्यावसायिकांना विक्री करण्याची नामी संधी असणार आहे. इतकेच नव्हे तर पहिल्यांदा क्रेडाई व्यतरिक्त इतर बांधकाम व्यावसायिकांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. स्टॉलची रचना प्लॅटिनम, गोल्ड आणि सिल्वर अशी असणार असून त्यांना भारतातील प्रामुखी नद्यांची नावे दिली जाणार आहेत. या प्रदर्शनाला मुख्य प्रायोजकत्व स्टेट बँक ऑफ इंडियाने केले आहे.
‘लकी ड्रॉ’ द्वारे स्टॉल चे वितरण
या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना लकी ड्रॉ पद्धतीने स्टॉल दिले जाणार आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यात बुधवारी क्रेडाईच्या कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यानंतर लकी ड्रॉ प्रमाणे सहभागी झालेल्या बांधकाम व्यावसायिकांना स्टॉल वितरित करण्यात आले. या प्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी क्रेडाई कार्यालयाशी लवकरात लवकर संपर्क साधावा , असे आवाहन संयोजक इंद्रजीत थोरात आणि सहसंयोजक संग्राम पठारे यांनी केले.
-या एक्सपोच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र क्रेडाईचे माजी अध्यक्ष राजेंद्र सिंग जाबिंदा, प्रमोद खैरनार, देवानंद कोटगिरे, पापालाल गोयल, सुनील पाटील, रवी वट्टमवार, नरेंद्र सिंह जाबिंदा, त्याचप्रमाणे विद्यमान अध्यक्ष नितीन बगडिया, सचिव अखिल खन्ना, विकास चौधरी, संयोजक इंद्रजीत थोरात, सहसंयोजक संग्राम पठारे, अनिल मुनोत, सुनील बेदमूथा, सुनील राका, पंजाब तौर, रोहित सूर्यवंशी, मनोज काला, अजित सिंग, अजित बापट, बालाजी येरावर, प्रशांत अमिलकंठवार, दीपक कुलकर्णी, गोपेश यादव, समीर मालखरे, सौरभ गुप्ता, साहिल कासलीवाल, श्वेता भारतीय आणि हेमा सुखिया आदी प्रयत्नशील आहे.