साठलेले पाणी काढून देण्यासाठी शिवराम राऊत यांचे तहसीलदार यांना निवेदन

शिरूर (प्रतिनिधी) आज दि.१५ सप्टेबर रोजी धनश्री शेतकरी मंडळ हिवरसिंगा यांच्या वतीने श्री.शिवराम राऊत यांनी मा.तहसिलदार शिरूर यांना मौ.हिवरसिंगा येथील कॅनाल रोड लगत असणारे रेल्वेच्या वळण ररस्त्यासाठी तयार केलेला पूलाखाली नियमित प्रतिवर्ष हे पाणी साठले जाते.त्या साठलेल्या पाण्याचे प्रमाण छोट्या तलावाप्रमाणे आहे.त्यामुळे भोवतालच्या जमीनीत पाणी मुरूम पिके वाया जातात.नेहमीच पावसाळ्यात हि समस्या निर्माण होते.अनेक वेळा रेल्वेचे काम करणारे कर्मचारी.इंजिनियर यांना कळवले जाते पण ते काहीच करत नाहीत.रेल्वेचे काम झाल्यापासून आत्तापर्यंत शेतकऱ्यांची अनेक पिके वाया जाऊन लाखोरूपयांचे नुकसान झाले आहे.

आज ज्या ठिकाणी पाणी साठवून तळे होत आहे.तिथे रेल्वे चालू झाल्यावर चां मुख्य वळण रस्ता आहे.तेव्हांची तर समस्या गंभीर असेल पण अनेक वर्षांपासून या साठलेल्या पाण्यामुळे भोवतालची जमीनीतील पाणी पाझरल्याने सर्व पीके वाया जातात.पावसाचे प्रमाण वाढले तर त्या पुलाखालून पाणी शेतात जाते.ऐवढ्या गंभीर प्रश्नावर रेल्वेच्या काम करणारे अधिकारी.कंत्राटदार यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे.तरी या संबंधी योग्य ती कारवाई करूण पुलाखालून पाण्याचा निचरा करण्यासाठी संबंधित यंत्रणेला कळवणे संबंधीचे निवेदन सादर केले.

त्या.वेळी शिरूरचे कर्तव्य तत्पर मा.तहसीलदार साहेब यांनी तात्काळ संबंधित रेल्वे च्या यंत्रणेला फोन करूण शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सुचना केली आहे.