औरंगाबाद : जायकवाडी धरणातून सध्या मोठ्या प्रमाणात पाणी गोदापात्रामध्ये सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरणातून सध्या चोवीस हजार क्युसेक पाणी गोदापात्रात सोडण्यात येत आहे. यावर्षी जायकवाडी धरण जुलैमध्येच भरल्यामुळे जायकवाडीमधून पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. सोमवारी सायंकाळी जायकवाडीतून 24 हजार 104 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. सध्या प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून 8 हजार 14 क्युसेक इतका विसर्ग करण्यात येत आहे तर निळवंडेतून 1 हजार 108 क्युसेक, ओझर बंधाऱ्यातून 3 हजार 482 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.  गोदावरी नदीत नांदूर मध्यमेश्‍वर बंधाऱ्यातून 8 हजार 938 क्युसेक विसर्ग सुरू आहे. भिमा नदीत 34 हजार 934 क्युसेक, घोड नदीत घोड धरणातून 16 हजार 230 क्युसेक आणि मुळा नदीत मुळा धरणातून 5 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.