अवैध हॉटेल चालकांसह मद्य सेवन करणाऱ्या सात जणांनावर विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची

औरंगाबाद(विजय चिडे)औरंगाबाद ते बीड बायपास रोडवरील गांधेली फाटा येथील हॉटेल यारा-दा ढाबावर बसून दारू पिणाऱ्यांसह हाँटेल चालकांसह सात जणांना वर राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभागाने (दि.१४)रोजी कारवाई केली.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क अ-विभाग औरंगाबादचे निरिक्षक ए. जे. कुरेशी यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने औरंगाबाद ते बीड बायपास रोडवरील गांधेली फाटा येथील हॉटेल यारा-दा ढाबा ता. जि. औरंगाबाद येथे छापा टाकला असता. त्या ठिकाणी ढाबा चालक मखन सिंग चंदन सिंग काहलो वय ४७ वर्षे रा. ओवोरॉय हाईट्स, गुरुद्वान्या जवळ उस्मानपुरा ता. जि. औरंगाबाद यास व त्याचे हॉटेल यारादा ढावा मध्ये अवैधरित्या दारू व दारू पिण्याकरिता ग्राहकांना ठेवलेल्या टेबल, खुर्चा, ग्लास व इतर साहित्य जप्त करून दारू पित बसलेल्या १. कमलेश शेषराव दाभाडे वय 40 वर्षे रा. इंदिरा नगर, गारखेडा परिसर ता. जी. औरंगाबाद२. किशोर रुपचंद शिंदे वय ४० वर्षे रा. गजानन नगर, ता. जि. औरंगाबाद.३. निलेश नवलसिंग चंदनसे वय ३५ वर्षे रा. गांधेली पो. आडगाव बु. ता. जि. औरंगाबाद४. मनोज एकनाथ मिस्त्रळ वय ४० वर्षे रा. जय भवानी नगर, ता. जि. औरंगाबाद. ५. अभिजित मधुकरराव प्रधान वय ४३ वर्षे रा. अरिहंत नगर, औरंगाबाद ता. जि. औरंगाबाद.

६. प्रफुल्ल उत्तमराव प्रधान वय ४० वर्षे रा. जवाहर कॉलनी, औरंगाबाद ता. जि. औरंगाबाद.

७. सुनील दिगंबर सोनवणे वय ४१ वर्षे रा. न्यू हनुमान नगर, गारखेडा परिसर ता. जि. औरंगाबाद या सातही जणांना ताब्यात घेतले असून शासकीय रुग्णालय (घाटी) औरंगाबाद या ठिकाणी वैद्यकीय तपसणी करून त्यांचे रक्तांचे नमुने घेण्यात आले आहे. सदर कारवाईत एकूण रु. २९७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील सर्व इसमांन विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास ए. जे. कुरेशी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अ-विभाग औरंगाबाद हे करत आहे. सदरची कारवाई राहुल गुरव निरीक्षक, बालाजी वाघमोडे दुय्यम निरीक्षक, गणेश इंगळे दुय्यम निरीक्षक, बी. ए. दौंड दुय्यम निरीक्षक, जी. एस. पवार दुय्यम निरीक्षक, गणेश नागवे स. दु. निरीक्षक, जवान विजय मकरंद, ज्ञानेश्वर सांबारे, अनिल जायभाये, गणपत शिंदे व ठाणसिंग जारवाल यांचे पथकाने केली आहे .