संभाजीनगर : हिंदूहृदयसम्राट हे फक्त बाळासाहेब ठाकरेच आहेत, आणि ते त्यांना जनतेने दिलेलं पद आहे, असं मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत. सर्व साधारणपणे दुर्गम भागामध्ये शिक्षकांनी राहावे, अशी अपेक्षा आहे आणि जे एकदम जवळ असतात जे व्हिकल्स वापरत, असतील एवढा खर्च करून हे सगळे मुद्दे तपासून बघितले जाईल. पण एका टोकाला जाऊन दोन्ही मुद्दे दोन्ही बाजूने ताणून धरणे हे मला शक्य वाटत नाही. मी सर्व मुद्दे तपासून बघेल थोडासा वेळ द्यावा, संघटनेशी चर्चा करावी लागेल, यातून मार्ग काढावा लागेल. ज्यावेळेस मी शिक्षण खात्याचा आढावा घेत होतो. त्यावेळेस दहा-दहा तास एकाच वेळेस मीटिंग घेतलेली आहे, सकाळी आठ वाजता येऊन मीटिंग घेतलेली आहे. मध्ये कुठेतरी कार्यक्रम असतात गणपती वगैरे सुट्ट्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा एकदा या कामाला सुरुवात होणार आहे. सर्व राज्यासाठी असतं मुलांना शिक्षणात ओळख असावी म्हणून फोटो लावावे शिक्षकांचा जो परिचयाचा बोर्ड ड असतो त्या ठिकाणी शिक्षकांचे फोटो लावावे, यातून मार्ग निघू शकतो परंतु चर्चा झाली पाहिजे. वस्तुस्थिती तपासण्यासाठी कमिटी करावी लागत नाही आमची यंत्रणा सक्षम आहे. त्यावेळेस आम्ही चेक करू शकतो. परंतु मी अगोदर तुम्हाला सांगितलं की मी संघटनाशी चर्चा करेल नंतर बंब साहेबांचं ऐकून घेईन हिंदू हृदय सम्राट हे फक्त बाळासाहेब ठाकरेच आहे आणि ते त्यांना जनतेने दिलेलं पद आहे असे दीपक केसकर म्हणाले.