पिके-फळबागाचे पंचनामा करुन शेतकर्यांना मदत द्या
आ. सुभाष देशमुख यांच्या जिल्हाधिकार्यांना सूचना
सोलापूर :- दक्षिण सोलापूर तालुक्यातील अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसानीत झालेल्या पिके-फळबागाचे पंचनामा करुन शासकीय मदत द्यावी, अशा सूचना आ. सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिल्या आहेत.
गेल्या दोन- तीन वर्षात शेतकर्यांवर अनेक संकटे आली आहेत. शेतकरी त्यातून कसाबसा मार्ग काढत असतानाच आता अतिवृष्टी झाल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात दक्षिण तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. जिल्हाधिकार्यांनी अधिकार्यांमार्फत नुकसानीत झालेल्या पिके-फळबागाचे पंचनामा करुन शेतकर्यांना शासकीय मदत द्यावी, सर्कल निहाय गावाचा समावेश न करता तालुक्यातील सर्वच गावाचा समावेश करावा, असे आ. देशमुख यांनी म्हटले आहे.