सोलापूर - जिल्हा परिषदे मधील ग्रामविकास अधिकारी संवर्गातून ९ ग्रामविकास अधिकारी यांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती देणेत आली आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. 

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज ग्रामसेवक संवर्गातून ९ ग्रामसेवक यांना विस्तार अधिकारी पदी पदोन्नती देणेत आलेल्या कर्मचारी यांचा सत्कार करणेत आला. त्यानंतर सिईओ दिलीप स्वामी व अतिरिक्त सिईओ संतोष धोत्रे यांचे हस्ते नियुक्ती पत्र देणेत आले. या

प्रसंगी , सहाय्यक गटविकास अधिकारी महेश पाटील, ग्रामसेवक संघटनेचे शरद भुजबळ, ग्रामसेवक संघाचे टी आर पाटील , ग्रामसेवक नारायण संघटनेचे ढवळे आदी प्रमुख उपस्थित होते. सहाय्यक गटविकास अधिकारी महेश पाटील यांचे स्वागत करणेत आले. 

ग्रामविकास अधिकारी सदाशिव कोळी, संजय पाटील, राजकुमार मोरे, दयानंद बिराजदार यांना पंचायत विस्तार अधिकारी पदी तर प्रतिभा पवार, तात्यासाहेब साठे, नवनाथ पांडव, बसवराज दहिवडे, तानाजी अंधारे, बसवराज डोळ्ळे यांना विस्तार अधिकारी कृषी या पदावर नियुक्ती देणेत आली. या प्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी महेश पाटील यांचे स्वागत करणेत आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांचा ग्रामसेवक संघटनेचे वतीने सत्कार करणेत आला. ग्रामसेवक संघाचे वतीने मान्यवरांचा सत्कार करणेत आला. कनिष्ठ प्रशासन अधिकारी झहीर शेख, वरिष्ठ सहाय्यक नरसिंह गायकवाड, ग्रामसेवक संघटनेचे शरद भुजबळ, ग्रामसेवक संघाचे टी आर पाटील यांचा सत्कार करणेत आला. 

ग्रामविकास अधिकारी पदावरून विस्तार अधिकारी झालेले संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 

चांगले काम करा - सिईओ स्वामी 

ग्रामविकास अधिकारी पदावरून विस्तार अधिकारी पदी पदोन्नती मिळाली आहे. विस्तार अधिकारी म्हणून जबाबदारीने काम करा. चांगले नियोजन करीन नाविण्यपुर्ण उपक्रम राबवा. असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. सर्व प्रक्रिया पुर्ण होणेसाठी जरी वेळ लागला असता तरी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी यासाठी सकारात्मकौ भुमीका ठेवून काम केले.