जिंतूर न्यूज रिपोर्टर : माबुद खान

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

सध्या सर्वत्र लम्पी चर्मरोगाचा प्रदुर्भाव निदर्शनास आला असल्याने नागरीकांना त्याच्या प्रकोपापासुन वाचविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी संपुर्ण परभणी जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणुन घोषीत केले आहे. ज्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले

आहे. त्यातच जिंतूर शहरात सध्या मोठ्या प्रमाणात मोकाट डुकरे वराह फिरत आहेत. या डुकरांमुळे लंपी सह इतर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे.त्या मुळे सदर डुकरांचा बंदोबस्त करावा, तसेच या डुकरांचे पालन करण्यास बंदी घालावी, याबाबत नगर परिषद प्रशासनाला आदेशित करावे.अशी मागणी जिंतूर शहरातील विविध संघटनांच्या वतीने तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात करण्यात आली. या डुकरांमुळे रोगाचा फैलाव झाल्यास याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील,असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.  या निवेदनावर टिपु सुलतान सेना जिल्हाध्यक्ष शेख अहेमद शेख समद,शेतकरी संघटना शहराध्यक्षपठाण हारुणखान अब्दारखान,आसेफ पठाण, शेख अझर, सय्यद कलीम, शेख तौफिक, शेख अदनान,सुफीयान खान,सय्यद सुलेमान, आबेद पठाण, शफीक तांबोळी,अरबाज खान,शेख कैफ आदींच्या सह्या आहेत.