प्रशासनाने सहानुभूती पुर्वक विचार करून आर्थिक मदत करण्याची नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची विनंती
पालम :- दिनांक :14/9/2022 रोजी सकाळी ठीक 9 वाजता पालम- फळा रोडमार्गे विजेची मुख्या लाईन ओढली गेली आहे. सदर लाईन चा तार तुटून आकाडया शेजारी बांधलेल्या बैलावर तार पडला यात बैलाचा जागीच मृत्यु झाला आहे. सदर घटना ही माधवराव सखाराम पौळ यांच्या शेतात झाली असून त्यांच्या बैलाचा मृत्यु झाला आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच
सदर घटनेचा पंचनामा मा. वैद्यकीय अधिकारी, मा. तलाठी, गुळखुंड सज्जा, महावितरण अधिकारी व पोलिस प्रशासन यांच्या अनुषंगाने करण्यात आला आहे. यामध्ये शेतकरी माधवराव यांचे 80 ते 90 हजाराचे आर्थिक नुकसान झाले असून ते आर्थिक संकटात आले आहेत. सध्या हंगामाचे कार्य चालू असल्याने त्यांना लगेच पर्यायस्वरूपी नविन बैलाची आवश्यकता लागेल परंतु आर्थिक अडचनीमुळे नविन बैल घेणे शक्य नाही. त्यांना प्रशासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती प्रशासनाकडे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.