उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी यांच्या वतीने जवाहर विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य श्री.बळीराम वटाणे साहेब उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.अभिजीतराव वाघमारे साहेब (मोटार वाहन निरीक्षक R.T.O.परभणी), श्रीमती चारुशीला फुलपगार मॅडम (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक R.T.O. परभणी), जेष्ठ शिक्षक श्री. एस.एस.इंगळे सर, श्री.व्ही.बी.आदमाने सर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रथमतः विद्यालयातर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रमुख पाहुणे श्री.अभिजीतराव वाघमारे साहेबांनी विद्यार्थ्यांना रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घेणे, रस्ता अपघात होऊ नये म्हणून खबरदारी घेणे याबद्दल कायद्याचा आधार घेऊन मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले.
यानंतर अध्यक्षीय भाषणात श्री.बळीराम वटाणे साहेबांनी विद्यार्थ्यांनी आपल्याला दिलेल्या बाजूने रस्त्याने चालावे व काळजी घ्यावी असे आवाहन करत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कल्याण भोसले सरांनी केले तर आभार श्री.प्रदीप चव्हाण सरांनी मांडले तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.