परभणी(प्रतिनिधी)आमदार डॉ.राहुल पाटील यांनी संबर, मटकऱ्हाळा, देवठाणा रस्त्यांची अधिकाऱ्यांसह पाहणी करुन पंधरा दिवसात काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 संबर ते मटकऱ्हाळा हा रस्ता खराब झाल्यामुळे या रस्त्याची पाहणी आ. डॉ. पाटील यांनी मंगळवारी (दि.13) केली. यावेळी साबांचे उपकार्यकारी अभियंता विघ्ने, अभियंता लव्हेकर, तहसीलदार चव्हाण, तलाठी संदीप बडगुजर, दिनेश बोबडे, अरविंद देशमुख, संदीप झाडे, शिवाजी चोपडे, उत्तम मुळे, सुभाष काळे, रामप्रसाद झाडे उपस्थित होते.

संबर ते मटकराळा, पिंपळगाव टोंग, देवठाणा यादेखील रस्त्यांची पाहणी करत संबर ते मटकराळा रस्त्याचे काम पंधरा दिवसात सुरू करा, काम चांगले करा, दर्जेदार काम न केल्यास कंत्राटदारावर गुन्हे दाखल करा, अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना केल्या, तसेच संबर येथील मासोदाच्या पुलाची उंची वाढवा अशी सूचना देखील केली.

संबर येथील शाळेचे बांधकाम लवकर सुरू होणार

संबर येथील जिल्हा परिषदेची शाळेची इमारत 1956 मध्ये बांधली होती. ही इमारत जीर्ण झाली असून मोडकळीस आली आहे त्यामुळे या ठिकाणी तात्काळ नवीन इमारत बांधण्याचे आदेश आमदार डॉ.पाटील यांनी दिले असून लवकरच हे काम सुरू होईल असे यावेळी सांगितले.