दावरवाडीच्या श्री संत गुलाब बाबा आश्रमात घुसले पावसाचे पाणी.
"कल्याण टोल कंपनीच्या ढिसाळ कारभारामूळे भक्तांचे हाल"
पाचोड(विजय चिडे) पैठण तालुक्यातिल दावरवाडी येथील पाचोड-पैठण रस्तावरील श्री संत गुलाब बाबा आश्रमात पाणी घुसले असून येथे चक्क गुडघ्याऐवढले पाणी साचले असल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणी चा सामना करावा लागत आहे.
श्री संत गुलाब बाबा आश्रम दावरवाडी ता. पैठण येथील मुख्य रस्त्यावर कल्याण टोल कंपनीने पावसाच्या पाणी व्यवस्था केली नाही. रस्त्यावरील पाणी बाहेर निघण्यासाठी रस्तालगत असणाऱ्या नालीही अर्धवट केल्यामुळे श्री गुलाब बाबा आश्रम संपूर्णतःपाण्याने भरला आहे.
यामुळे गुलाब बाबांच्या भाविक भक्तांना दर्शनाला जाण्यास मार्ग बंद झाला आहे. यामुळे भाविक संतप्त झालेले आहेत. याच बरोबर येथील परिसरात या पाण्यामुळे सापांचेही प्रमाण वाढले आहे.अशी माहिती गुलाब बाबा आश्रम संचालक मंडळाकडून मिळाली आहे. या सरपटणाऱ्या प्राण्यांपासून गुलाब बाबा आश्रमातील भाविकांना त्रास होऊ शकतो. यामुळे जर काही बरे वाईट झाले तर याला पूर्णतः जबाबदार संबंधित कंत्राटदार कंपनी राहील असा ही इशारा गुलाब बाबा आश्रम संचालक मंडळांकडून मिळाला आहे. लवकरात लवकर या अर्धवट नाल्याचे काम पूर्ण करून पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावावी व गुलाब बाबा आश्रमातील भाविकांना बाबांच्या सेवेसाठी मार्ग मोकळा करावा अशी मागणी गुलाब बाबा आश्रम संचालक मंडळाकडून मिळाली आहे.
छायाचित्र :- दावरवाडी (ता.पैठण) येथील श्री.संत गुलाब बाबा आश्रमात असे पाणी साचल्याने भाविकांची गैरसोय होत आहे.
(छाया-विजय चिडे,पाचोड)