भर पावसाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट.

"टाकळी अंबड येथे आठ दिवसापासून पिण्याच्या पाणीपुरवठा बंद; प्रतिक्रिया घेणाऱ्या पत्रकारास ग्रामसेवकांची अरेरावीची भाषा"

पाचोड(विजय चिडे) सुरुवातीलाच मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये नदी-नाले सह विहीर पाण्याने तुडुंब भरलेले असून देखील टाकळी अंबड ता.पैठण येथील नागरिकांना आठ दिवसापासून पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

इंदेगाव येथून पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा होतो. यामध्ये टाकळी अंबड, घेवरी व विठ्ठलनगर या तीन गावांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु विजेची थकबाकी आणि दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा वारंवार बंद केला जातो . त्या नळा पाणी सोडले जात नसल्याने या परिसरात पाण्याची टंचाई असल्याचे प्रशासनाला दिसत नाही का? असा संतप्त प्रश्न नागरिक करत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे या गावातील नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.

ग्रामपंचायत दुरस्तीच्या नावाखाली दरवर्षी खर्चात फरक करत असून सुध्दा ठोस उपाययोजनांचा अभाव असल्याने पाणी मुबलक असूनही लोकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. याकडे सरपंच,उपसरपंच, सदस्य यांच्या सह ग्रामसेवक यांचे लक्ष नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

चौकट-ग्रामसेवकाची पत्रकारांना आरेरावी.

आठ दिवसापासून टाकळी अंबड ता.पैठण येथे पाणी येत नसल्याची तक्रार नागरिकांनी पत्रकाराकडे केली असता. टाकळी अंबडचे ग्रामसेवक वसंत इंगळे यांना गावात पाणी का सोडले जात नाही. या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी दुरव्धीनीवरून संपर्क केला असता त्यांनी चक्क पत्रकारास आरेवारीची भाषा वापली आहे.

चौकट-यंदा पाऊस पाणी चांगला असल्यामुळे विहिरी तुंबळ पाण्याने भरलेले आहे.तरी देखील गेल्या आठ दिवसापासून नागरिकांना पाणी सोडले जात नाही. यामुळे महिलांची पाण्यासाठी फजीती होत आहे. या बाबतीत ग्रामसेवकांना भेटण्यासाठी ते सतत गैरहजर राहत असल्यामुळे त्यांचीशी भेटत होत नाही.दूरध्वनीद्वारे संपर्क केला तर त्यांच्या कडून नूसते उडवा उडवीची उत्तर देण्यात येत. तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून नागरिकांना पाण्याची व्यवस्था करून द्यावे अशी असे विश्वास पवार,दिपक मधुकर नरके यांनी म्हटले आहे.

(संग्राहीत फोटो)