केज (प्रतिनिधी) घर बांधण्यासाठी तुझ्याआई-वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन का येत नाहीस? या कारणावरून सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळास कंटाळून एका २६ वर्षीय विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील ढाकेफळ येथे घडली.या प्रकरणी तिच्या पतीसह चौघाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पती आणी दिरास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील ढाकेफळ येथील मयत शिल्पा योगीराज घाडगे हिचा विवाह आठ वर्षांपूर्वी योगीराज शिवाजी घाडगे यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर त्या दोघांना दोन मुली व एक मुलगा अशी तीन अपत्य झाल्यानंतर माहेरहून घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून पती योगीराज घाडगे,सासु लक्ष्मीबाई घाडगे,दिर बाळासाहेब घाडगे आणी जाऊ माया घाडगे यांनी शिल्पाला तगादा लावला परंतु तिने तिच्या आई वडील ला कडून तेवढी रक्कम आणण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी शिल्पाला सतत शिवीगाळ व मारहाण करीत तिचा मानसिक आणी शारीरिक छळ केला.सासरच्या लोकांकडून सातत्याने होत असलेल्या छळास कंटाळून शिल्पा घाडगे हिने ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या दरम्यान विषारी औषध प्राशन शिल्पाला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु १० सप्टेंबर रोजी रात्री २:०० वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू असताना शिल्पा योगराज घाडगे हिचा मृत्यू झाला.अनिता दिलीप शिरसट रा.फुले नगर धारूर यांच्या फिर्यादीवरून पती योगीराज घाडगे, सासु लक्ष्मीबाई घाडगे, दिर बाळासाहेब घाडगे आणी जाऊ माया घाडगे या चौघां विरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
'हर साल इंडियन रहूंगा...' Shahrukh Khan ने बस इतना कहा, फिर भावुक हो गए!
'हर साल इंडियन रहूंगा...' Shahrukh Khan ने बस इतना कहा, फिर भावुक हो गए!
तीन तगड़े फोन लेकर आया Vivo, 4500 निट्स ब्राइटनेस वाली डिस्प्ले और 50MP Sony कैमरा से लैस
Vivo X200 सीरीज चाइना में लॉन्च हो गई है। लेटेस्ट सीरीज में Vivo X200 Pro Mini समेत तीन...
Banaskantha: આગથળા પોલીસ એ વિદેશી દારૂના જથ્થા સાથે 1 ઇસમને જડપ્યો
આગથળા પોલીસ એ વિદેશી દારૂ ના જથ્થા સાથે એક ઇસમને જડપ્યો
આગથલા પીએસઆઇ એન એચ રાણા, મહેન્દ્રસિંહ,...
জোনাইৰ ডেকাপামত পুৱা ভয়ংকৰ পথ দুৰ্ঘটনা,
জোনাইৰ ডেকাপামত পুৱা ভয়ংকৰ পথ দুৰ্ঘটনা,
રક્તદાન કેમ્પ નુ આયોજન
"મૂલ્યવાન રક્તદાન બનશે, જરૂરિયાતમંદો માટે જીવનદાન.. !"
“રક્તદાન થી બચશે અનેક જીવ, થશે...