ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- (नवनाथ गायकर यांजकडून)-

   शिवसेना शिंदे गटाचे खा.हेंमत गोडसे व ईगतपुरी त्रंबकेश्वर मतदारसंघाचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी ईगतपुरी तालुक्यातील शिवसेना व काँग्रेस ला खिंडार पाडले आहे. शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग गांगड यानी समर्थकासह शिंदे गटात प्रवेश करत शिवसेनेला जबर धक्का दिला आहे, तर काँग्रेसचे दिग्गज नेते तथा घोटी क्रु.उ.बा.चे माजी सभापती संपतराव काळे यांनी ही काँग्रेस ला सोडचिठ्ठी देत समर्थकासह शिंदे गटात प्रवेश केला आहे.

   दरम्यान या दोन दिग्गज नेत्यांच्या शिंदे गटात प्रवेशाने शिंदे गटाची मतदारसंघात ताकद वाढताना दिसत आहे तर याचा मोठा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहायला मिळणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.

   ठाकूर समाज संघटीत ?

   माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हे ठाकूर समाजाचे दिग्गज नेते असुन या मतदारसंघात ठाकूर समाजाची मते निर्णायक आहे. ठाकूर समाजाचेच जेष्ठ नेते व अध्यात्मिक क्षेत्रात दबदबा असलेले माजी आमदार पांडुरंग गांगड यांच्या शिंदे गट प्रवेशाने ठाकूर समाजाची संघटित ताकद शिंदे गटाबरोबर उभी रहात असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शिंदे गट मतदारसंघात मजबूत होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा दावा मेंगाळ यांनी केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेत सातत्याने दुय्यम वागणूक मिळत असल्याने व ठराविक कंपुपुरतीच मर्यादित असलेल्या मुळे अनेक नाराज ही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

काळेच्यां प्रवेशाने सिन्नर ची समीकरण बदलणार ?

   दरम्यान दुसरीकडे ईगतपुरी तालुक्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते तथा घोटी क्रु.उ.बा.चे माजी सभापती संपतराव काळे यांनी ही शिंदे गटात प्रवेश केल्याने सिन्नर मतदारसंघात शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

   काळे यांनी यापूर्वी सिन्नर मतदारसंघात काँग्रेस कडून विधानसभा निवडणूक लढवलेली असुन आगामी काळात ते सिन्नर मतदारसंघात शिंदे गटाचे प्रबळ उमेदवार होऊ शकत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

  तसेच टाकेद जि.प.गटात काळेचां प्रभाव असुन या गटात ही शिंदे गट आगामी काळात प्रबळ होणार आहे.