सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये गावांच्या दृष्यमान स्वच्छतेची राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यासाठी दि.१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत स्वच्छता ही सेवा हे अभियान राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले , केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशनानुसार दि.१५ सप्टेंबर २०२२ ते दि.२ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती अंतर्गत स्वच्छता ही सेवा ही मोहीम राबवली जाणार आहे.या वर्षी सदर मोहीमेची दृष्यमान स्वच्छता ही संकल्पना आहे. त्यानुसार सुचविलेल्या कालावधीत स्वच्छता ही सेवा गावामध्ये दृष्यमान स्वच्छतेसाठी एक राज्यव्यापी मोहीम राबविण्यासाठी स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत खालील उपक्रम राबविले जाणार आहेत.

गावामध्ये दृष्यमान स्वच्छता , गावातील कचरा कुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई , कचरा स्त्रोताच्या ठिकाणी (सुका व ओला) कचरा वेगळे करण्यासाठी जनजागृती करणे , कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्र निर्माण करणे , प्लॅस्टिक सारख्या अविघटनशिल कचरा एकत्रित करुन नियोजन करावे, पाणवठ्यांजवळील परिसर स्वच्छ ठेवुन त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण करणे , एकल प्लॅस्टिक वापराच्या दृष्परिणामांबद्दल गावसभा आयोजित करुन यापुर्वी प्लॅस्टिक वापरावर बंदीबाबत घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी करावी , हागणदारीमुक्त अधिक घटकावर सरपंच संवाद आयोजित करणे,गावात कचरा न करण्यासाठी जनजागृतीपर घोषवाक्य लेखन , प्रतिज्ञा घेणे , प्लॅस्टीक बंदी व स्वच्छता या विषयावर वक्तृत्व/निबंध / रागोंळी/सजावट व देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी गावातील मंडळांना आवाहन केले जाणार आहे.

 स्वच्छता ही सेवा या अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी होऊन सदरचे अभियान अतिशय प्रभावीपणे राबवावे आणि प्रत्येकांनी आपल्या गावात शाश्वत स्वच्छता ठेवण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं./पा.व स्व.) इशाधीन शेळकंदे यांनी केले आहे.