सोलापूर- जिल्ह्यात सायकल बॅंकेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज मंगळवेढा तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी १०० सायकली देऊन जिल्ह्यातील सायकल बॅंकेस सायकल देणेचा विक्रम केला आहे.
पंचायत समिती मंगळवेढा येथे सर्व विभागांच्या विकास कामाचा आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतली. यावेळी बैठकी साठी आलेले सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते सायकल बँक या उपक्रमांतर्गत पंचायत समितीच्या विविध विभागांच्या सहकार्यातून तालुक्यातील शालेय विद्यार्थीनींना १०० सायकलींचे वितरण करण्यात आले. या वेळी जिल्हा शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार, गटविकास अधिकारी शिवाजी पाटील, गटशिक्षणाधिकारी बी बी पांढरे, बालविकास प्रकल्प अधिकारी जे बी गारूळे, उप अभियंता बांधकाम प्रविण सासवडे, उप अभियंता राजकुमार पांडव, पशु वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुहास सलगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी बांकर उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी विद्यार्थीनींशी संवाद साधला. यावेळी गट विकास अधिकारी शिवाजी पाटील, सर्व विभाग प्रमुख व पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात सायकल बॅंके साठी सायकली देणे साठी चढाओढ लागली आहे. यामध्ये मंगळवेढा पायात समिती देखील मागे पाहिली नाही. गटविकास अधिकारी शिवाजी पाटील यांनी मेहनत घेऊन सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांचे सहभागातून १३१ सायकली जमा करून मुलींना सिईओ दिलीप स्वामी यांचे वितरीत केल्या.
सायकल बॅंकेस एवढा प्रतिसाद मिळेल असे वाचले नव्हते. नेवरे येथे आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांचे हस्ते सायकल बॅंकेस सायकलींचे वितरण झाले. निमगाव येथे आमदार राम सातपुते यांचे हस्ते तर पंचायत राज समितीचे सदस्यांना ही संकल्पना आवडली. तसेच आमदार सुभाष देशमुख यांचे हस्ते सायकल वितरण करणेत आले. जिल्ह्यात सायकल बॅंकेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंगळवेढा तालुक्यांतील सर्व ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, उमेद, आशा, आरोग्य सविका, सर्व विस्तार अधिकारी सर्व विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी परिश्रम घेतले आहे.
मंगळवेढेकरांचे प्रतिसादाने भारावलो- सिईओ स्वामी
मंगळवेढाकरांनी सायकल बॅंके साठी भरभरून दान दिले आहे. संताची भुमी मुलींना शिक्षकासाठी आधार देणे साठी पुढे आली आहे. १०० सायकली देऊन जिल्ह्सात सर्वाधिक पुढाकार मंगळवेढा तालुक्यांने घेतला आहे. याचा मला अभिमान आहे. जिल्ह्यात सायकल बॅंक चळवळ होत आहे. आमदारांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवेढा तालुक्यांतील १०० सायकलीमुळे मुलींचा शाळेचा प्रवास सुकर झाला आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
तालुक्यांत २०० सायकली दान देणार - बिडीओ पाटील
मंगळवेढा तालुक्यांतील मुलींना २०० सायकली वाचक करणेत येणार आहेत. यामधील १०० चा टप्पा पुर्ण केला आहे. सिईओ स्वामी यांचे संकल्पनेस तालुक्यांतील चांगला प्रतिसाद मिळत आहे.