हिंगोली भिम शक्ती पार्टीच्या औंढा नागनाथ तालुक्यासाठी युवा तालुकाध्यक्षपदी निवृत्ती उर्फ बाळुभाऊ मधुकर पांडवविर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भिम शक्ती संघटनेच्या बळकटीकरणासाठी व मजबुती करण्यासाठी संघटनेचे ध्येय धोरणे व माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांचे विचार सर्व सामान्य पर्यंत पोहचविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याअनुषंगाने भिम शक्ती पार्टीच्या औंढा नागनाथ तालुक्यासाठी युवा तालुकाध्यक्षपदी असोला येथील निवृत्ती उर्फ बाळु मधुकर पांडवविर नियुक्ती करण्यात आली आहे. या निवृत्ती उर्फ बाळु पांडवविर यांना नियुक्तीचे पत्र देताना मराठवाडा उपाध्यक्ष मिलिंद मोरे, युवा जिल्हाध्यक्ष विशाल इंगोले, परभणी भीमशक्ती जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ भिसे, भाऊराव कंठाळे, बबन वावळे, बुद्धभूषण कीर्तने, आदिनाथ गुलखे आदींची उपस्थिती होती.