जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून पशुवैद्यकीय अधिकारी यांचे चंदगव्हाण येथे लम्पी आजारा बदल मार्गदर्शन

वसमततालुक्यातील चंदगव्हाण येथे आज दिनांक 13 /09 2022 रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशावरून आज आठवडी बाजार बद करण्यात आला . त्या अनुषंगाने लघु पशु सर्व चिकित्सालय वसमत यांच्याकडून लम्पी चर्मरोग नियंत्रण बाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास गावातील स्त्री पुरुष पशुपालन शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर लक्ष्मणराव पवार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हिंगोली यांनी मार्गदर्शन केले तर डॉक्टर हदय कुमार कारवार सहाय्यक आयुक्त यांच्या बॅनर प्रदर्शनासह लंबी चर्मरोग आजारावरून अनेक कारणे परस्पर व त्याचे नियंत्रण कसे करावे याचे सविस्तर मार्गदर्शन केले डॉक्टर पवार मनाली की गोठा स्वच्छता असावा गोचीड माशा यांचे नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणी केल्यास आजाराचा प्रसार होणार नाही पशुपालकांनी गावकऱ्यांनी सावध राहावे आजारी जनावर असल्यास जवळच्या दवाखान्याची संपर्क साधावा असे देखील आव्हान करण्यात आले यावेळी जनावरावर कीटकनाशक लंपी प्रतिबंधक फवारणीचे प्रात्यक्षिक करण्यात आली या कार्यक्रमास श्री आर बी खंडागळे श्री तरोडे श्री जितेंद्र तेलगोटे श्री घाटोळ व पत्रकार श्रीधर वाळवंटे श्री नांगरे ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते