श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यात एस टी स्टॅन्ड तसेच गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडुन अडीच लाखांचे दागिने हस्तगत केले असुन 1) सोनाली विजय काळे 2) काजल विजय काळे 3) कार्तिका शर्मा चव्हाण 4) लखन विजय काळे सर्व रा. पाथर्डीरोड, शेवगाव ता. शेवगाव जि अहमदनगर यांना ताब्यात घेतले आहे.

श्रीगोंदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि 5 ऑगस्ट रोजी अर्चना गणेश खलाटे (वय 30) रा. लोणीव्यंकनाथ ता.श्रीगोंदा या दि 5 ऑगस्ट रोजी दुपारी 3 च्या सुमारास मिरजगाव येथे भावाच्या लग्नाला जाण्यासाठी श्रीगोंदा बसस्टॅण्डवर स्वारगेट ते आष्टी या एस टी बस मध्ये चढत असताना त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाचा तपास चालू असताना श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना सदर गुन्ह्याबाबत योग्य त्या सुचना देत मार्गदर्शन केले. त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी , शहरातील बसस्टॅण्ड तसेच इतर गर्दीच्या ठिकाणचे 20 सीसीटीव्ही फुटेज तपासले व तांत्रिक तपास केला. त्यावेळी दि 8 सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरची चोरी ही शेवगाव येथील महीलांनी केली आहे. पोलिसांनी त्याचदिवशी शेवगाव येथे गुन्हेगार वस्तीवर कोंबिंग ऑपरेशन करुन संशयित महीला 1) सोनाली विजय काळे (वय 22) 2) काजल विजय काळे (वय 21) 3) कार्तिका शर्मा चव्हाण (वय 38) 4) लखन विजय काळे (वय 20) , सर्व रा. पाथर्डीरोड, शेवगाव ता. शेवगाव ताब्यात घेतले. त्यांना गुन्ह्यात अटक करुन न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दिली. पोलिसांनी या संशयितांकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर आरोपिंनी गुन्ह्यात चोरलेले 46 ग्रॅम वजनाचे 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. यातील आरोपी लखन विजय काळे याच्यावर यापुर्वी शेवगाव पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव आणि पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे करत आहेत.

हि कामगिरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग, सहायक फौजदार अंकुश ढवळे (SDPO), पोलिस नाईक गोकुळ इंगवले, महिला पोलिस नाईक लता पुराणे, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादासाहेब टाके, अमोल कोतकर, रविंद्र जाधव, प्रशांत राठोड, नितिन शिंदे, महिला पोलिस कॉन्स्टेबल छाया म्हस्के, छाया माने, यांनी केली आहे.