मालेगाव तालुक्यातील ग्राम कोळदरा येथील कु.कोमल श्रीकृष्ण ठाकरे हिचा संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष अर्जुन पाटील खरात यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोळदरा येथे दि.5 सप्टेंबर सोमवारी रोजी येथील कु.कोमल श्रीकृष्ण ठाकरे गावालगत असलेल्या शेतातील विहरी वर पाणी भरण्यासाठी गेली आसता. या ठिकाणी येथील महिला सिंधुबाई लठाड विहरी मध्ये भुरळ येऊन विहरी मध्ये पडली या वेळी मोठ्या हिमतीने कु.कोमल हिने विहरीत दोर टाकून सिंधुबाईला दोर पकडण्यास सांगितले व कोमल गावातील नागरिक येईपर्यंत दोर धरून विहरी जवळ उभी होती. वर्ग आठवी मध्ये शिकत असलेल्या कु.कोमल श्रीकृष्ण ठाकरे हिची हिम्मत पाहता कोळदरा येथील कु. कोमलचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन पाटील खरात, दिपकराव शेवाळे ( जिल्हा कार्य अध्यक्ष ),वृषीकेश खरात ( संभाजी ब्रिगेड रिसोड तालुका अध्यक्ष ), अनिल साठे ( लहुजी शक्ती सेना मालेगाव तालुका अध्यक्ष ) अजय चोथमल ( पत्रकार ) या वेळी उपस्थित होते..

*प्रतिक्रिया*अर्जुन पाटील खरात*( संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष वाशिम ) मालेगाव तालुक्यातील कोळदरा येथील बातमी पत्रकार अजय चोथमल यांनी प्रकाशित केलेली बातमी वाचली आणि त्या विद्यार्थीनी जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. म्हणुन संभाजी ब्रिगेडच्या वतीने छोट्या खानी कु. कोमल ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन तिचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.