अकोला

माननीय जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे दिनांक 28 सप्टेंबर 2022 ला अखिल भारतीय सम्राट सेना  ई क्लास जमिनीचे वहीतीदार अल्पभूधारक शेतकरी यांनी अनेक वेळा शासन दरबारी निवेदन देऊनही विचार केला गेला नसल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर न्यायहक्कासाठी उपोषणाला बसले असून स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे .मौजे दुर्गवाडा गट क्रमांक 246 निंबा व सांगवी गट क्रमांक 39 मधील मागील 40 वर्षापासून वही ती करीत असल्याने भूमिहीन शेतकऱ्यांचे हिरवेगार पीक मोडून काढण्यात आले त्यामुळे भूमीही शेतकरी कर्जबाजारी होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे करिता आमच्या मागण्या योग्य निर्णय घेऊन तात्काळ मंजूर करून द्याव्यात ही विनंती घेऊन उपोषण सुरू आहे.