उदगीर रिक्षाच्या आतील व मागील बाजूस अनेक प्रकारच्या चारोळ्या वाक्य म्हणी लिहिलेले व रिक्षातील आतील बाजूस आरसे व साऊंड ऑटो रिक्षात सर्रास दिसतात यामुळे पोलीस व आरटीओ यांची भीती व कायद्याची भीती नसल्याने दिसते तालुक्याचे ठिकाण असलेल्या उदगीर येथे जवळपास 7000 रिक्षा आहेत अनेक ऑटो रिक्षावर हसून बघण्यापेक्षा बसून बघ सासऱ्याचा आशीर्वाद काय बघतोस रागाने साईड मारली वाघाने सासऱ्याचा आशीर्वाद पैसा गेला पण नादच केला पास हे समुंदर दूर है किनारा खुदा कसम क्या सुंदर है चेहरा तुम्हारा असे अनेक प्रकारचे वाक्य रिक्षावर लिहिले असतात तसेच रिक्षा बस आतील बाजूने आरसे लावत त्यावर वेगवेगळे मजकूर लिहिलेले असतात त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे अनेक रिक्षा विनापरवाना शहरातील रिक्षा काही रिक्षांना पासिंग नाही काही रिक्षांना परवाना नाही काही रिक्षा चाल विणा लायसन रिक्षा चालवतात बरेच रिक्षा अल्पवयीन मुले चालवतात तसेच रिक्षा चालकासाठी ड्रेस पाहिजे पण कोणत्याही रिक्षा चालकाकडे प्रेस नसल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांना त्रास होतो रात्रीच्या वेळी रिक्षाला किती भाडे असायला पाहिजे याविषयी काहीही नियम नसल्याने अहवाच्या सव्वा मनाने भाडे आकारले जात आहे त्यामुळे रिक्षा चालकाकडील लायसन्स व कागदपत्रे याकडे प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न प्रवासीच विचारत आहेत पोलीस निरीक्षकांनी साऊंड काढले शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी शहरात मोठ्या मोठ्याने गाणे वाजवत चालणाऱ्या रिक्षातील साऊंड काढत रिक्षा चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला त्यामुळे रिक्षातून येणारा आवाज कमी झाल्याचे चित्र आहे मात्र अजूनही रिक्षा नाशिक असल्याने रहदारीला अडचण होत आहे