निसर्ग ढाब्याजवळ मृत्यूस कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सेनगाव ते येलदरी निंबाळ तांड्याजवळ निसर्ग ढाबा या ठिकाणी 8 सप्टेंबरला भरधाव ट्रॅक्टर क्रमांक एम एच 38 व्ही झिरो दोन 78 च्या चालकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजी पणे चालवून पिकप क्रमांक२०ईसी ४०२७ला जोराची धडक देऊन विठ्ठल गायकवाड किनर यांच्या डोक्याला व पायाला मार लागून वाहन मालक दळवी यांच्या छातीला मार लागला व उद्धव राठोड यांच्या डोक्याला चेहऱ्याला गंभीर मार लागून काना नाकातून रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला उद्धव राठोड यांच्या मृत्यू व इतरांना जखमी करण्यास ट्रॅक्टर चालक कारणीभूत ठरला व अपघातामध्ये पिकप चे 35 हजाराचे नुकसान केल्याने सेनगाव पोलिसात विठ्ठल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर बी जाधव व जीवन मस्के करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे