औरंगाबाद:- दि.१२ स.(दीपक परेराव )२९ सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक हृदय दिन हा कौटुंबिक शासकीय, सामाजिक पातळीवर हृदयाच्या आरोग्या संबंधी जनजागृती करून साजरा केला जातो.

या अनुषंगाने मेडिकव्हर हॉस्पिटल औरंगाबाद मध्ये कार्डिओलॉजी विभागाची यशस्वी वाटचाल या विषयी कार्यक्रम आयोजित केला होता.

महाधमनीचा कोआर क्टेशन "ह्या गंभीर जन्मजात आजारावर गुंतागुंतीची बिन टाक्यांची शत्रक्रिया डॉ. सुमित शेजोळ यांनी यशस्वी रित्या पार पाडल्या. पलमोनरी एम्बोलें कीटनी हि शत्रक्रिया डॉ.मनीष पुराणिक यांनी करण्याची महाराष्ट्रात हि पहिलीच वेळ असावी. तसेच आओर्टिक डिसेक्शन" अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी पार केली.

अतिशय गंभीर डायबेटिक हृदय विकारांचा झटका आलेला रुग्ण वेळे वर आला त्यांची ऑजियो ग्राफी व करोनरी ऑजियो प्लास्टी करून १००% ब्लोकेजेस असताना यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉ. विक्रांत देशमुख यांनी रुग्णाचे प्राण वाचवले.

मेडिकव्हर हॉस्पिटल्स मध्ये कार्डिओलॉजी विभागाच्या तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे असून त्या मध्ये प्रामुख्याने डॉ. मनिष पुराणिक MBBS M. S. M. CH. (CVTS) Cardiovascular व & Thoracic surgeon डॉ. सुमित शेजोळ [ MBBS, MD, DM(Cardiology) डॉ. विक्रांत देशमुख MBBS, MD, DM ( cardiology ) यांचा समावेश आहे. या सर्व टीमने यशस्वी शत्रक्रिया केल्या.

 रुग्ण बरे होऊन आपले दैनंदिन जीवन आनंदाने जगत आहे. अशाच यशस्वी रुग्णाला आज रुग्णांना हॉस्पिटल मध्ये बोलवून त्यांच्याशी संवाद साधन्यात आला त्यांचा हॉस्पिटल बाबतचा अनुभव त्यांनी सांगितला.

या विषयी अधिक माहिती देताना मेडिकव्हर हॉस्पिटल्स च्या केंद्र प्रमुख डॉ. नेहा जैन यांनी सांगितले की, २९ सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन साजरा करत असताना तसेच सप्टेंबर महिना "कार्डियाक मंथ"  म्हणून विविध कार्यक्रमच आयोजन केले आहे. त्यात आम्ही आधीच्या

रुग्णांना मोफत आरोग्य तपासणीसाठी बोलावले आहे.डाएटिशियन कल्याणी लोंढे (ठाकरे) msc in food scince & nutrition nutritionist या कसा आहार घ्यावा काय पथ्य पाळावे सर्व यात मार्गदर्शन करणार आहेत.आणि डॉ. माधुरी दळवी फिजिओथेरपिस्ट यांनी कोण कोणते व्यायाम करावेत या विषयी व्याख्यानाचा समावेश केला

आणि मेडिकव्हर हॉस्पिटल्स तर्फे 18 सप्टेंबर 2022 रोजी "वर्ल्ड हार्ट डे "निमित्य मॅरेथॉन च आयोजन केले आहे वेळ सकाळी ६.३० वाजता स्थळ मेडिकव्हर हॉस्पिटल्स चिश्तीया चौक एन ६ सिडको औरंगाबाद ते गजानन मंदिर पर्यंत मॅरेथॉन असणार आहे. हि माहिती डॉ. नेहा जैन यांनी पत्रकारांना दिली.

ECG, २D Echo / TMT, सिटी स्कॅन, एमआरआय, अल्ट्रा मॉडर्न टेकनॉलॉजीची कॅथलॅब आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त अशी पॅथॉलॉजी विभाग या सर्व सुविधा उपलब्ध आहे.

सर्व प्रकारच्या अति जटिल शस्त्रक्रिया करताना मेडीकव्हर हॉस्पिटल्स मधील सर्व सुविधा एकाच छताखाली •असल्यामुळे व तज्ञ डॉक्टरांची टीम सोबत असल्यामुळे अशा जटील शस्त्रक्रिया करणे यशस्वी होत आहे, करोनरी ऑजियो ग्राफी व करोनरी ऑजियो प्लास्टी ( हातातून), हृदयाच्या छिद्रांच्या बिनटाक्याच्या शत्रक्रिया पेसमेकर शत्रक्रिया, कोआकटो प्लास्टी हृदयाच्या झडपांच्या (हार्ट वाल्व्हस) शत्रक्रिया मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आहेत. २४ तास अत्यावश्यक सेवा कॅश लेस सुविधा उपलब्ध आहेत.