पाचोडमध्ये एकाच दिवसांत पंधरा जणांना कुत्र्याने घेतला चावा,

"परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत;जखमीत दहा पुरूष तर पाच महीलांचा समावेश"

पाचोड(विजय चिडे) एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या पिसाळलेल्या कुत्र्यांनी दहशत निर्माण करून सोमवारी (दि.१२) सकाळी आठ पासुन ते पाच वाजेपर्यंत पंधरा जणांचा चावा घेतल्याची खळबळजणक घटना पाचोड ता.पैठणमध्ये घडली असून यात पाच महीला तर दहा पुरूषांना कुत्र्यांने चावा घेतलेल आहे.

या बाबत अधिक माहीती आशी की,पाचोडच्या विविध भागात मोकाट कुत्र्यांनी थैमान घातल्याने सर्व नागरिक भयभीत झाले होते. या सोमवारी सकाळी परिसरातील काही गावातील नागरिक हे पाचोडमध्ये यावेळी दोन पिसाळलेल्या दोन कुत्र्यांनी सकाळ पासून एकाच दिवसांत या १)वैशाली शामराव सोनवणे (वय३३)रा.औरंगाबाद,२)स्वाती रामेश्वर तवार (वय ३०)रा.डोमेगाव,३)शारदा चिवाटे (वय३५)रामगव्हाण,४)कल्पना घुले (वय२६)रा.पाचोड,५)श्रुती धारकर (वय५४)रा.पाचोड,६)शेख कय्युम शेख उस्मान (वय५४)रा.पाचोड,७)विजय जगन्नाथ जाधव (वय२६)रा.पाचोड,८)महादेव पवार (वय३८)रा.माळेवाडी,९)खालिद मुशाद शेख (वय४०)रा.पाचोड,१०)बळीराम खरात (वय७०)रा.पाचोड,११)ज्ञानेश्वर हिवाळे (वय४८)रा.चित्तेगाव,१२)अमोल ढाकणे (वय३०)रा.झोडेगाव,१३)जाकीर सय्यद (वय४२)रा.जामखेड,१४)मिठ्ठु दत्ता नारळे (वय६०)रा.पाचोड,१५)कृष्णा मेवालल जाबंकर(वय१०)रा.पाचोड या पंधरा जणांना चावा घेतल्याने पाचोड परिसरात दोन दिवसापासून भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे. या प्रकाराबाबत येथील पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात संवाद साधला असता, आज दिवसांत येथे हे  श्वानदंश बाधित रुग्ण दाखल झाल्याचे सांगितले. यामध्ये ज्यांच्या पायाला व हाताला तर काही इतर व्यक्तीच्या इतर भागाल चावा घेतला असून त्या रुग्णांना पाचोड येथिल ग्रामीण रुग्णालायात उपचार करण्यात आले असून काही रूग्णां औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी पाठविले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डाँ.शिवाजी पवार असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.श्वानदंशावरील इंजेक्शन आजही येथे उपलब्ध असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याने त्याची नोंद आमच्याकडे नसल्याचे त्यांच्याकडून या वेळी स्पष्ट करण्यात आले असून संबंधिताने तात्काळ या कुत्रांचे बंदोबस्त करावे अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.