भास्कर जाधव यांचे शिवसेनेवरील ग्रहण दूर करण्याचे नागनाथाकडे साकडे

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी आज औंढा नागनाथ या ठिकाणी ज्योतिर्लिंग नागनाथाचे दर्शन घेऊन शिवसेनेवर आलेले संकट दूर करण्याचे साखरे त्यांनी यावेळी नागनाथाला घातले. तसेच कोणीही शिवसेनेसोबत गद्दारी केली तरी मराठवाड्यातील जनतेने शिवसेनेला साथ दिल्याचे शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी सांगितले आहे. हिंगोली या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तर या मेळाव्यासाठी भास्कर जाधव हे हिंगोली जिल्ह्यांमध्ये दाखल झाले असता त्यांनी औंढा नागनाथ या ठिकाणी नागनाथाचे दर्शन घेऊन नागरिकांशी संवाद साधला आहे.