भोगाव येथील जगदंबा देवी चांदीच्या सिंहासनावर विराजमान.

जिंतूर: जिंतूर तालुक्यातील श्रीक्षेत्र भोगाव देवी येथे जगदंबा देवीचे मंदिर असून तालुक्याचे श्रद्धास्थान आहे.निसर्गरम्य परिसरात असलेल्या मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून शारदीय नवरात्रौत्सव अत्यंत उत्साहाने व भावभक्तीने साजरा केला जातो.परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून ही भाविक मोठ्या संख्येने नवरात्रौत्सव निमित्त दर्शनासाठी येतात.येत्या २६ सप्टेंबर पासून नवरात्र सुरू होणार असून त्यानिमित्ताने भाविकांनी स्वेच्छेने दिलेल्या देणगीतून जगदंबा देवी साठी एकूण अंदाचे 28 किलो वजनाचे चांदीचे सिंहासन बनविले जात  असून त्यापैकी 14 किलो चांदीचे सिंहासनावर  दि.१०सप्टेंबर रोजी भोगाव ची आई जगदंबा  विराजमान झाली असून उर्वरित सिंहाच्या मूर्तींचे काम प्रगती पथावर आहे.सध्या पितृ पक्ष लागल्याने पितृ पक्ष संपल्यावर सिंह मूर्ती बसविल्या जाणार आहे. सिंहासन साठी जवळपास चारशे भक्तांनी स्वेच्छेने देणगी दिली असून त्यापैकी काही भक्त भिवंडी (मुंबई) येथील आहेत. अशी माहिती विश्वस्त मंडळाने दिली आहे. या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार गुलाबचंद राठी असून प्रल्हादराव आण्णा देशमुख, भगवानराव देशमुख,प्रमोद पांडे,सुभाषचंद्र तिवारी,शेवाळे साहेब,विठ्ठल देशमुख,व्यवस्थापक रितेश पांडे हे आहेत.सिंहासन साठी प्रामुख्याने भोगाव चे सरपंच कृष्णा देशमुख,मंदिराचे पुजारी किशोर गुरू,मनोज गुरू यांनी विशेष सहकार्य केले असे विश्वस्त मंडळाचे विठ्ठल देशमुख यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले