पुणे: "पुणे तिथं काय उणे" असं आपण म्हणतो पण एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभुमी नसल्याने पुढारलेल्या महाराष्ट्रात माणुसकीला लाजिरवाणी वाटेल अशी घटना घडली असुन धो धो पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साठलेले पाणी ओसरण्याची तब्बल तीन तास वाट पाहुणही पाऊस विश्रांती घेत नसल्याने तीन तास ताटकळतअसलेल्या ग्रामस्थांनी भर पाऊसातच तात्पुरता पत्र्याचा आसरा उभारून स्थानिक आदिवासी जेष्ठ नागरिकावर मुसळधार पाऊसात अंत्यविधीचे सोपस्कर पार पाडल्याने राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा पर्दाफाश झाला आहे.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याचे प्रतिक असलेल्या आणि त्यांच्या रक्ताने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सिंहगडाच्या पायथ्याशी आतकरवाडी मध्ये आज रविवार (दि 11) रोजी डोकं सुन्न करणारं हे भयावह चित्र पहायला मिळाल. येथील एका ज्येष्ठ नागरिकाचे निधन झाले होते. संबंधित नागरिकाचा अंत्यविधी करण्यासाठी गावात हक्काची स्मशानभूमी नसल्याने त्यांचे अंत्यसंस्कार रस्त्यातच करावे लागणार होते. मात्र सिंहगड खोऱ्यात आज दुपारपासून जोरदार पाऊस पडत होता. स्मशानभूमीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने ग्रामस्थ पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. त्यामुळे तब्बल तीन तास अंत्यविधी लांबला मात्र पाऊस काही थांबत नव्हता. त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी भर पावसातच चितेवर आसरा म्हणून लाकडी खांब उभे करून त्यावर पत्रे टाकुन अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.

पुणे शहराच्या अगदी जवळ असलेल्या गावातले हे वास्तव चित्र राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढणारेच असुन घेरा सिंहगड मध्ये आठ ते दहा लहान मोठी गावे आहेत. बहुतांश गावात अद्यापही स्मशानभूमीची सोय नाही. येथील ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी हक्काची जागाच नसल्याने येथे राज्य सरकार आणि जिल्हा परिषदेमार्फत स्मशानभूमी उभारल्या गेल्या नाहीत. त्यामुळे येथे अनेक ठिकाणी रस्त्यातच अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले जातात. ग्रुप ग्रामपंचायत घेरा सिंहगडला चार महसुली गावे असून देखील गावठाणच नाही. गावठाण मागणीचे प्रस्ताव राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडे पाच ते सात वर्षापासून धूळखात पडलेले आहेत. 

आज रविवार असल्याने आतकरवाडी सिंहगड पायथ्याशी वाहनांची मोठी वर्दळ होती. पीएमपीएमएल व इतर वाहने अधीक असल्याने अंत्यविधी करण्यात अडचण येत होती. मात्र येथील स्थानिकांचा नाईलाज होता त्यामुळे भर पावसातच आदिवासी ज्येष्ठ नागरिकांवर अंत्यविधी पार पाडावे लागले.मृत्यूचेनंतर देखील संबंधित दुर्दैवी आदिवासी नागरिकावर हि वेळ आली. या अंत्यविधीप्रसंगी पंचक्रोशीतील शेकडो नागरिक आणि नातेवाईक उपस्थित होते.मुसळधार पावसातच या मृत व्यक्तीवर अंत्यविधी होत होता .

घेरा सिंहगड ग्रामपंचायत मार्फत आतकरवाडी, सांबरेवाडी, थोपटेवाडी, भडाळेवाडी, दुर्गदरा व इतर ठिकाणी स्मशानभूमीसाठी राज्य सरकारमार्फत वन विभागाची जागा मिळावी म्हणून वेळोवेळी मागणी केली जात आहे मात्र वन विभागाच्या जाचक अटीमुळे हे जागा मागणीचे हे प्रस्ताव लालफितीतच अडकून पडले आहेत. माजी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी जागा मागणीचे आपले गार्हाणे पोहचवले आहे. घेरा सिंहगड मधील मधील नागरिकांची स्मशानभूमीसाठीची ही परवड आणखी किती दिवस चालणार असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.