आदर्श सुपुत्रांचा मायभूमी धनगांव येथे गौरव 

-----------------------------------------------------------

आज गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर धनगांव येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने गावातील आदर्श सुपुत्रांचा गौरव करण्यात आला.या मध्ये महाराष्ट्र शासनाचा कृषिरत्न पुरस्कार प्राप्त वसंतराव कातबने, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ताराचंद हिवराळे,सेवा निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण माळी व कोण होईल करोडपती फेम प्रियांका महाले यांचा सत्कार केला.या वेळी सर्व सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी श्रीकांत जोशी,माजी पंचायत समिती सदस्य बबन बोबडे यांनी सुद्धा आपल्या भावना प्रगट केल्या.

या प्रसंगी दादासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी सरपंच बापूसाहेब कातबने,उपसरपंच योगेश बोबडे,चेअरमन विष्णु बोबडे,रावसाहेब कणसे,कल्याण खवले,सुरेश गरड,ज्ञानेश्वर महाले,विष्णू कातबने,संजय इमले,दत्ता कणसे,काकासाहेब कातबने,जगन्नाथ बोबडे,गौतम गल्हाटे,कैलास कणसे,यज्ञेश कातबने,बाळासाहेब मिसाळ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.