हिंगोली-परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असणारे येलदरी धरण सद्यस्थितीत शंभर टक्के भरले असून या धरणातून पूर्णा नदी पत्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे सेनगांव तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या असलेल्या 11 गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.पूर्णा पाटबंधारेच्या येलदरी जलाशयातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून येलदरी धरण 100% भरले आहे त्यामुळे धरणावरील जलविद्युत केंद्राचे दोन युनिट सुरू करून टर्बाईन आउटलेट गटातून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात आला आहे. धरणातील पाणीसाठा व संभाव्य पाण्याची आवक लक्षात घेता जलाशयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाटबंधारे खात्याने येलदरी जलाशयातून दरवाजे उघडत कोणत्याही क्षणी पूर्णा नदीच्या पत्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे सेनगांव तालुक्यातील बन बरडा,वझर सालेगांव,उटी पूर्ण,सोनसावंगी बोडखा,हुडी, हुडी लिंबाळा धानोरा बंजारासह अकरा गावे पूर्णा नदी पात्राच्या काठी आहेत नदीकाठच्या गावांना तहसीलदार जिवक कुमार कांबळे यांनी सतर्कतेचा इशारा दिला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.