रत्नागिरी - रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत या बेपत्ता होत्या. बेपत्ता असलेल्या पत्नीची पतीकडूनच हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असुन स्वप्नाली सावंत यांना जाळून मारण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांनी अटक केली असून यामध्ये स्वप्नाली सावंत यांच्या पतीचाही समावेश आहे.

स्वप्नाली सावंत यांच्याविरोधात 1 सप्टेंबर रोजी हत्येचा कट रचण्यात आला होता. पती सुकांत उर्फ भाई सावंत, रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत आणि प्रमोद बाबू गावनांक या तिघांनी कट रचून स्वप्नाली यांना जाळून त्यांची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांकडून या तिघांना अटक करण्यात आली आहे. स्वप्नाली आणि त्यांचे पती सुकांत या दोघांमध्ये अनेकदा वाद होत असत. तसेच एकमेकांचे फार पटत नव्हते, असं सांगण्यात येत आहे. परंतु या हत्येमागचं नेमकं कारण काय...? हे अद्याप समजू शकलेले नाही.