चंद्रपूर (Chandrapur) शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते बंद पडले. रस्त्यावर पाणी तुडुंब वाहू लागल्याने वाहतूक खोळंबले होते. मागील दोन-तीन दिवसांपासून वातावरणामध्ये उकाडा जाणवत होता. या पावसामुळे आज गारवा निर्माण झालेला आहे. 

भारतीय हवामान खात्याच्या नागपूर वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज 11 सप्टेंबर रोजी दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरातील श्री टॉकीज चौक ते बिनबा गेट मुख्य रस्त्यावर देखील पावसाचे पाणी साचल्याने मार्ग जलमय झाला होता. त्यामुळे नागरिकांना पाण्यातून येजा करताना गैरसोय झाली. खाल भागात राहणाऱ्या अनेक वस्त्यांमध्ये काही घरांमध्ये पाणी घुसले. समाधी वाढ परिसरातील 22 चौक येथे नालीचे पाणी घरात घुसण्याचा प्रकार घडला.

तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध ठिकाणी पाऊस सुरू असून पुढचे पाच दिवस कोकण, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातही काही भागात पाऊस पडत असून पुढच्या पाच दिवसांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे शहर, सिंहगड, खडकवासला या भागांत दुपारनंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. तसेच पुढील तीन ते चार तास पाऊस राहिल असाही इशारा देण्यात आलाय.

दरम्यान, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 forecast by the Nagpur observatory of India Meteorological Department. 

 Nagpur observatory of India Meteorological Department. 

११ सप्टेंबर १६:१५ (पुढील ३ तास)

विजांसह पाऊस: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर