कल्याण टोल कंपनीच्या ढसाळ कारभारमुळे शेताला आले तळ्याचे स्वरूप..

"पाचोड खुर्द येथील परिसरात कल्याण टोल कंपनीच्या भोंगळ कारभाराने पिके धोक्यात"

पाचोड(विजय चिडे) पैठण-अंबड या रस्त्याचे काम मागील दोन वर्षापूर्वी कल्याण क्रंट्रशन टोल कंपनीने पुर्ण केले.मात्र पाचोड खुर्द येथील शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याची व्यवस्था न केल्याने येथील तीन-चार शेतकऱ्यांची शेती न राहता एक तलाव बनून राहिला आहे.पाचोड खुर्द परिसरात काल रात्री झाले जोरदार पाऊस झाला आहे यामुळे सर्व पाणी अडवले जाऊन मोठा तलाव निर्माण झाला आहे.

या तलावामुळे पाणी जमा होऊन शेत जमीनीतिल मधील पिके ही पाण्याखाली गेली आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरले रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पाचोड खुर्द येथिल नदी शेजारील शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांनी लावलेल्या बी-बियाणे संपूर्ण वाहून गेले आहे.यामुळे शेतकऱ्यांचा मोठे नुकसान झाले आहेत.यंदा पाऊस पाणी साथ दिली,परंतु ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे अनेक जणांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

कल्याण टोल कंपनीला पाचोड खुर्द येथील सरपंच नितीन वाघ सह संबंधित शेतकऱ्यानी या पाण्याबाबतीत वेळोवेळी सांगितले होते.परंतु त्यांनी ते न ऐकल्याने.ठेकेदाराच्या हलर्गीपणामुळे रस्तालगतच्या वाघ यांच्यामध्ये देखील पाणी घुसले असून शेतकऱ्यांचे नूकसान झाले असून या नुसकानीचा मोबदला ठेकेदारांनी द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असुन नाराजी व्यक्त केली आहे.

फोटो काँप्शण-पाचोड खुर्द परिसरात कल्याण टोल कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेताला तळ्याचे स्वरूप आलेले दिसत आहे.

छाया-विजय चिडे,पाचोड.