छत्रपती शिवाजी महाराज ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय पर्यंतचा मुख्य रस्ता हा अतिक्रमण काढल्याशिवाय करू नये या गेली 58 दिवसापासून धरणे आंदोलन करते पत्रकार हे धरणे आंदोलनासाठी बसले आहेत भविष्यात निवडणुकीसाठी सज्ज असलेले संबंधित उमेदवार प्रशासन सार्वजनिक बांधकाम खाते यांनी एकदाही आंदोलन करते पत्रकाराकडे पाहिले नाही त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीसाठी बसलेले सर्वच उमेदवार यांनी आंदोलन करते पत्रकाराकडे फिरवली पाठ उदगीरच्या विकासासाठी असलेल्या मुख्य रस्त्याची लावली वाट! असेच म्हणावे लागते नागरिकांच्या मूलभूत गरजा म्हणजे पाणी आणि रस्ते हे आहेत या दोन गोष्टीवर जनता जनार्दन ही अवलंबून असते खरे पाहता या दोन्ही गोष्टीवर सर्वच राजकारणी पुढारी यांचे लक्ष असणे गरजेचे आहे यावरच यांचे त्यांचे राजकीय भविष्य अवलंबून असते तालुक्याचा व शहराचा विकास करत असताना विकासाबरोबरच आवश्यक असलेले विषय म्हणजे पाणी आणि रस्ते यावर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे दळणवळणासाठी व नागरिकांच्या रधारीसाठी रस्ता हा मुख्य विषय आहे परंतु उदगीर येथील संबंधित सर्वच राजकीय कारणी पुढारी प्रशासन यांचे सतत दुर्लक्ष झालेले आहे नुसता उदगीरचा विकास होऊन चालणार नाही त्यासाठी विकासाबरोबर रस्त्यांचा वापर झपाट्याने झाला पाहिजे तरच उदगीरचा विकास झाला असा म्हणावे लागेल अरुंद रस्त्यामुळे उदगीर शहरातील रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आज नागरिकांना व वाहनांना चालणे अवघड होऊन बसलेले आहे याच प्रश्नासाठी उदगीरचे आंदोलन करते पत्रकार हे गेली पण 58 दिवसापासून धरणे आंदोलन करत आहेत याबाबत तीत अतिक्रमण काढल्याशिवाय रस्ते व नालीचे काम करू नये म्हणून विभागीय आयुक्त साहेबांना ही आदेश पण दिलेल्या होता या आदेशाला केराची टोपली दाखवत जलद गतीने रोडचे काम अतिक्रमण हटवला हटवता चालू आहे देखावा म्हणून धातू-मातूर रस्त्यावरती अतिक्रमण करण्यात आले परंतु मुख्य अतिक्रमण करण्यात आलेल्या नाही यासाठी परत दुसऱ्यांदा धरणे आंदोलन करते पत्रकारांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलनासाठी बसावे लागले ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे पत्रकारांना या देशाचा चौथा स्तंभ म्हणून संबोधीला जातो या चौथ्या कामांना धरणे आंदोलनासाठी 58 दिवस बसावे लागत आहे ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने बरोबर नाही प्रशासनाचे अधिकारी हे शासनाने जनतेच्या सेवेसाठी ठेवलेले आहे परंतु प्रशासनाचे अधिकारी हे या आंदोलन कर्त्याकडे रस्त्याच्या कामासाठी दुर्लक्ष करीत आहेत जर या आंदोलन करते पत्रकारांची मागणी मान्य नाही झाल्यास यापुढे पण धरणे आंदोलन चालूच राहणार आहे असे पत्रकार यांच्या वतीने कळविलेले आहे राजकारणी मंडळी प्रशासन यांनी ही बाब मनावर घेतल्यास हे धरणे आंदोलन चारच दिवसात मिटू शकते परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे या करिता राजकीय मंडळी व प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष घालून उदगीरच्या विकासासाठी मागणीप्रमाणे रस्ता तयार करावा व असलेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे अशी सर्व स्तरातून नागरिकांची मागणी होत आहे
सुधाकर नाईक उदगीर