जर्मनीत नुकत्याच पार पडलेल्या आयर्नमॅन 2022 या स्पर्धेत चंद्रपूरातील डाॅक्टरांनी यश संपादित करत चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जगपातळीवर लौकिक केले आहे. या सर्व डाॅक्टरांचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांनी सत्कार केला. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अमल पोद्दार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगांवकर, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे शहर प्रमुख सलिम शेख, युथ शहर प्रमुख राशेद हुसेन, बंगाली समाज शहर संघटिका सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, आशा देशमुख, गौरव जोरगेवार, चंद्रशेखर देशमुख आदिंची उपस्थिती होती.
शारीरिक सहनशक्ती आणि मानसिक चपळतेची कठीण समजली जाणारी आयर्नमॅन ही स्पर्धा जर्मनीतील ड्यसबर्ग येथे घेतली जाते. यंदा या स्पर्धेत चंद्रपूरातील डाॅक्टरर्स आणि पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. यात १.९१ किलोमीटर पोहणे, ९१ किलोमिटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर धावणे हे तिन प्रकार होते. या तिन्ही प्रकारात चंद्रपूरच्या इंडियन मेडिकल असोसिएशनशी संलग्नित डाॅक्टरांनी पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. याची दखल चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी घेत सदर सर्व पुरस्कार प्राप्त विज्येत्यांचा सत्कार केला आहे. यावेळी आ. जोरगेवार म्हणाले कि, डॉक्टरी व्यवसाय हा अतिशय व्यस्त आहे. अशी व्यस्त दिनचर्या असूनही खेळासाठी वेळ काढत डाॅक्टरांनी मिळविलेले हे यश कौतुकास्पद आणि अनेकांसाठी प्रेरणादाई आहे. चंद्रपूरचा युवक आता क्रिडा क्षेत्रात रुची दाखवू लागला आहे. अनेक खेळ प्रकारात चंद्रपूरचा खेळाडू उत्तम कामगिरी बजावत आहे. अशात या डाॅक्टरांनी जर्मनी येथे जाऊन संपादीत केलेले हे यश या खेळाडुंसाठी सुध्दा प्रेरणादाई ठरणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी सत्कारमुर्ती म्हणून डॉ. सचिन भेदे, डॉ प्राजक्ता अस्वार, डॉ कल्पना गुलवाडे, डॉ. गुरुराज कुलकर्णी, डॉ. अभय राठोड, डॉ. रितेश दिक्षित, डॉ प्रसाद पोटदुखे, डॉ. अमित देवईकर, पोलिस कर्मचारी संदिप बल्की यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि फोटो फ्रेम देऊन विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.