धर्माबाद दि.१०.९.२०२२ - नायगाव विधानसभा मतदारसंघातील उमरी धर्माबाद व नायगाव तालुक्यासह जिल्ह्यातील सात लाख ४१ हजार ९४० अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले त्या संदर्भात तब्बल ७१७ कोटी ८८ लाखांची मदत राज्य शासनाने जाहीर केली असून आमदार राजेश पवार यांच्या सततच्या पाठपुराव्याला प्रचंड यश मिळाल्यामुळे त्यांच्यावर कौतुकांचा पाऊस पडत आहे.
आमदार राजेश पवार यांच्या पाठपुराव्यामुळे नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळाली आहे. खरीप हंगाम संपूर्णतः अतिवृष्टीमुळे हातचा गेला. शेतकऱ्यांची अवस्था अतिशय उद्विग्न झाली होती. अशातच राजकीय सत्तांतर झाले. आणि अतिशय कार्यतत्पर असलेल्या आमदार राजेश पवार यांनी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह कृषी मंत्र्यांना निवेदन दिले व नायगाव विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण नांदेड जिल्ह्याची शेतकऱ्याची सद्यस्थिती कथन केली. एवढेच नाही तर त्यांनी पावसाळी अधिवेशनात १८ ऑगस्ट रोजी अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने नायगाव विधानसभासह नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी देत करून घेतला. तात्काळ मदत विनंती केली हे सर्व मतदार संघाने थेट प्रक्षेपणाद्वारे टीव्हीवर पाहिलेच आहे! पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील आमदारांनीही अतिवृष्टीच्या समस्या मांडल्या. पण आमदार राजेश पवार हे तेवढ्यावरच न थांबता मंत्रालयातील प्रत्येक सचिव स्तरावर ही मदत नांदेड जिल्ह्याच्या पदरात पाडून संपूर्ण नांदेड शेतकऱ्यांसाठी
लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देण्यासाठी जीवाचे रान केले होते. सचिव स्तरावरील यांचा पाठपुरावा पाहून मंत्रालयीन कर्मचारी अगदी थक्क झाले होते. तशा प्रतिक्रियाही नांदेड जिल्ह्यात येऊन धडकल्या होत्या. आमदार राजेश पवार एवढ्यावरच न थांबता मतदार संघातील अंतर्गत रस्त्याची होत असलेली दयनीय अवस्थाही कथन केली त्यामुळे ५० कोटीचा निधीही आपल्या मतदार संघासाठी त्यांनी मंजूर
मिळण्याची आमदार राजेश पवार यांच्या प्रयत्नाने नायगाव मतदार संघालाच नाही तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एवढी मोठी अतिवृष्टीच्या संदर्भात नुकसान भरपाईची मदत मिळाल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा पाऊस पडत असून ती रक्कम आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खिशात जावी यासाठीही ते प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत.