धर्माबाद :- परभणी जिल्ह्यामधील सेलू येथील नाभिक समाजातील अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली त्याचे पडसाद धर्माबाद शहरात उमटले असून प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी व त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय जीवा सेना संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

        नाभिक समाजाच्या एका अल्पवयीन मुलीचे व तिच्या मावस भावाचे अपहरण करण्यात आले व त्यातील मुलाला काही अंतरावर सोडून देऊन मुलीस इतर ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचा अमानुष प्रकार सेलू मध्ये घडला. ही घटना संबंध मानव जातीला काळीमा फासणारी आहे. यातील आरोपींवर पोक्सो कायदा व बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करावेत व सदरील प्रकरण जलद गतीने न्यायालयात सरकारी पद्धतीने चालवण्यात यावा व यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी नाभिक समाज व अखिल भारतीय जीवा सेना संघटनेच्या वतीने मा. तहसीलदार धर्माबाद यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

       यावेळी अखिल भारतीय जीवा सेना संघटनेचे जिल्हा सचिव दत्तात्रय सज्जन तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड,लक्ष्मण नेमुलवार, गणेश संगमवार, सुरेश साळुंखे गजानन सज्जन, दिगंबर पांघरे,संतोष पांघरे दुर्गय्या येमुलवार,व्यकटेश येमुलवार दशरथ याटलवार व समाज बांधव उपस्थित होते.