परभणी(प्रतिनिधी)आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या उपस्थितीत ब्लू वॉरियर्स मित्र मंडळाचे अध्यक्ष बुद्धभुषण श्रीरंगराव हत्तीअंबीरे यांनी शेकडो सहकाऱ्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर ,श्रीरंगराव हत्तीअंबीरे, राहुल कांबळे, अमोल गायकवाड (शिवसेना दलित आघाडी जिल्हाध्यक्ष), माजी नगरसेवक सुशिल कांबळे, संभानाथ काळे, गौतम भराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बुद्धभुषण हत्तीअंबीरे यांनी या वेळी सांगितले की, या संकटकाळात आम्ही मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. आ. डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्ष वाढण्यासाठी दिवस रात्र मेहनत करू असे सांगून त्यांच्यासोबत पक्षात शाहु अंभोरे, आशिष धुळे, शुभम अंभोरे, आकाश लाटे व असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. सुत्रसंचालन संदिप प्रधान यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहु अंभोरे, शिवाजी अंभोरे, अमित काळे, आशिष धुळे, आकाश लाटे, शुभम अंभोरे, अंकुश वानखेडे, अखिल शेख, आनंद सरकटे, प्रितम कठाळे, बाळा साळवे, विष्णु कदम, पवन वायवळ, स्वरुप गाडे, अजय रसाळ, नितेश फुलवरे, राष्ट्रपाल वाघमारे,नागेश हत्तीअंबीरे, विशाल बुडगे, नागेश प्रधान, अमोल बुडगे, धिरज हनवते, शाम गवारे व ब्लु वॉरिअर्स मित्र मंडळ व मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मित्र मंडळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी परिसरातील नागरिक व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.