सलगरवस्ती पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार नोंद
सोलापुर - सोलापुरातील कवठे गावाचे सरपंच जैतूनबी उस्मान शेख हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहेत.
या बाबत मुलगा सरदारने सलगरवस्ती पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.
गावात इतर समाजातही उठबस असल्याने या जैतूनबी या भाभी म्हणून ओळखायच्या त्या कवठे गावच्या सरपंच झाल्या मात्र बुधवारी भाभी अचानक बेपत्ता झाल्याने संपूर्ण कवठे गाव सुन्न झाले आहे.
गावालगत व शेताजवळच्या सर्व विहिरी ,पाहुणे इतर गावे गावकऱ्यांनी पिंजून काढले आहे. तरी देखील भाभी यांच्या शोध लागला नाही आणि सलगरवस्तीचे पोलीस देखील या बाबत तपास करत आहे.