परभणी(प्रतिनिधी)भारत आणि जपान हे नैसर्गिक भागीदार आहेत. भारताच्या विकासाच्या प्रवासात जपानने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जपानशी नाते जिव्हाळ्याचे, अध्यात्माचे, सहकार्याचे, आपुलकीचे आहे.

    जपानसोबतचे नाते हे जगासाठी सामर्थ्य,आदर आणि समान संकल्पाचे आहे. बुद्धाचे, ज्ञानाचे, ध्यानाचे आहे. हाच धागा पकडून त्या ठिकाणी 'असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान, पुणे (AFJ)' त्या ठिकाणी काम करत असते. या संस्थेच्या संदर्भात परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर यांची संघटनेच्या सल्लागार समितीवर निवड झाल्याची घोषणा नुकतीच संघटनेचे AFJअध्यक्ष समीर खळे यांनी एका पत्राद्वारे कळविले आहे.

AFJ भारत आणि जपानमधील संबंध वाढवण्यासाठी शिक्षण, संस्कृती आणि व्यवसाय क्षेत्रात काम करत आहे. AFJ असोसिएशन 1990 मध्ये स्थापन झाली आणि तेव्हापासून भारत आणि जपानमधील लोकांमधील संबंध वाढवण्यासाठी विविध जपानी संस्थां-सोबत काम करत असते.

  Wakayama Prefecture व पुणे आणि महाराष्ट्र शासनामधील घनिष्ठ संबंध विकसित करण्यात AFJ ची भूमिका महत्वाची होती. याचं मैत्रीपूर्ण संबंधांचा एक भाग म्हणून AFJ जपानी आणि भारतीय अधिकाऱ्यांसोबत विविध चर्चासत्रे आणि बैठका आयोजित करणार असतात. त्यात आ.बोर्डीकर यांची सल्लागार म्हणून महत्वाची भूमिका असणार आहे.

'आंतरराष्ट्रीय मंचावर काम करण्याची संधी' - आ. मेघना साकोरे- बोर्डीकर

    आंतरराष्ट्रीय मंचावर भारत व जपान - महाराष्ट्र, पुणे, मराठवाडा आणि माझा परभणी जिल्हातील बचत गटातील महिला, शेतकरी, विद्यार्थी, खेळाडू, उद्योजक यांच्या कौशल्य विकासासाठी मला नक्कीच देवाणघेवाण करता येईल असा विश्वास सल्लागार समितीचे सदस्य म्हणून मला नक्की वाटतो. 'वसुधैव कुटुंबकम' या आपल्या संस्कृती प्रमाणे मी उत्तमोत्तम देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल