संगमेश्वर : दिवाळीच्या पुर्वसंधेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टी साखरपा दशक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, साखरपा देवरुख तिठा या ठिकाणी हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि देशासाठी प्राणांची आहुती देणारे शहिद जवान यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याकरता "एक दिवा शहीदां करिता" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेला विभाग संघटक आशिष कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून एकशेएक दीप प्रज्वलीत करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली मनसेचे विभाग अध्यक्ष सचिन कामेरकर, भाजपाचे उपतालुका अध्यक्ष अमित केतकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी भिकाजी दुधाणे, ओमकार दुधाणे विभाग सचिव,निलेश मोघे मुर्शी शाखा अध्यक्ष,कौस्तुभ केतकर कोंडगाव शाखा अध्यक्ष,विराज सावंत उप शाखाअध्यक्ष कोंडगाव, अशोक कांबळे, विनायक पावले,दौलत पावले, ऋषिकेश पांचाळ आदी मनसैनिक उपस्थित होते. भाजपाचे श्रीधर कबनूरकर, सुरेश गांधी, बबलू शिर्के तसेच बहुसंख्येने मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.