परतूर: तालुक्यातील मौजे वरफळ नदीपात्रातून दिवसा व रात्रीला रेतीची अवैध वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात सुरू.  

 परतूर महसूल व तहसील प्रशासन मात्र निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे रेती दिवसा व रात्रीच्या वेळी वाळूमाफिया कडून अवैध रेतीची खुलेआम वाळू तस्करी केली जात आहे या वाळू माफिया कडे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे अंकुश नसल्याने हे प्रकार घडत आहेत त्यामुळे ह्या बाबी कडे जालना चे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष देण्याची मागणी येथील पर्यावरण प्रेमी नागरिकांतून केली आहे

 तालुक्यातील मौजे वरफळ येथील नधी तून रेती उपसा रात्रदिवस अवैध रेतीचा उपसा सुरू आहे या कडे परतूर महसूल विभागातील तहसिलदार व या सज्जाचे तलाठी व मंडळ अधिकारी हे साफ दुर्लक्ष करीत असल्याने ? येथील रेती माफिया कदामाची सांगड प्रशासनाशी ! असल्याने ते कुणालाही न घाबरता सर्वांना हप्ते देऊन आम्ही हा धंदा करत आहोत अशा भाषेत बोलत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल दिवसरात्र चोरून घेत आहेत ! ते रात्रंदिवस रेती चोरी करून तालुक्यातील गोर गरीब घरकुल धारकांना बे भाव दराने रेती विक्री करत आहेत.