पाटोदा (प्रतिनिधी) सरकारने भारतीय नागरिकांना सोयी सुविधा सवलती किंवा आरोग्य सुविधा व विविध विकास योजना या राबवण्यासाठी काही महत्त्वाच्या योजना आणायच्या आहेत. त्यासाठी पाटोदा तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या मतदान कार्ड ला आधार कार्ड जोडुन घ्यावे असे आवाहन डोंगरकिन्ही गटाचे आमदार सुरेश धस समर्थक तथा गटप्रमुख अनिलशेठ काथवटे यांनी केले आहे.सरकारने ही कार्डची नोंदणी सुरु केली असुन आपल्या गावातील बी एल ओ कडे कार्ड ची झेरॉक्स प्रत देऊनही नोंद करता येते किंवा मोबाईल व्दारे कार्ड जोडुन घेता येते.या साठी संबंधित गाव वाड्या वस्तीवरील बी एल ओ शी संपर्क साधावा.ही जोडणी देश हिताची असुन प्रत्येक नागरिकाची संपूर्ण माहीत गोपनीय राहणार आहे.तसेच देशात किती बोगस आधार किंवा मतदार कार्ड आहेत याचाही शोध घेतला जाणार आहे.तसेच विविध विकास योजनांची माहिती तात्काळ अमलात आणता येणार आहे.पंचवार्षिक योजनेतून किती निधी खर्च करावा लागणार आहे याचाही आराखडा प्रत्येक वर्षी भारत सरकार तयार करणार आहे. पाटोदा तालुक्यातील सर्वच ठिकाणी ही नोंदणी सुरु असुन सर्वांनी मतदान कार्ड ला आधार कार्ड जोडुन घ्यावे असे आवाहन डोंगरकिन्ही गटाचे आमदार सुरेश धस समर्थक अनिलशेठ काथवटे यांनी केले आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं