बालकांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी .पुस्तके मुलांनी वाचावीत. म्हणून अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राने जिल्हास्तरीय पुस्तक वाचन स्पर्धा आयोजित केली होती.667 बालकांनी भाग घेतला . पहिल्या फेरीत तालुकास्तरावर सहा उत्कृष्ट बालवाचकांची निवड केली. जिल्ह्यात एकूण 60 बालवाचकांची निवड झाली. त्यांना तालुकास्तरावर सन्मानित केले. दुसऱ्या फेरीत जिल्हास्तरावर 14 उत्कृष्ट बालवाचकांची निवड झाली .त्यांचा अक्षर आनंद उत्कृष्ट बालवाचक म्हणून परभणी येथे सन्मान केला. यावेळी जिल्हाधिकारी आचल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, प्रसिद्ध साहित्यिक सुनील कुमार लवटे, शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे, डॉक्टर रामेश्वर नाईक, हवामान तज्ञ पंजाब डक ,दादासाहेब टेंगसे, कांतराव झरीकर, डी.आर.रणमाळे गट शिक्षणाधिकारी मानवत ,केंद्रप्रमुख शिरीष लोहट, डॉक्टर दिलीप शृंगारपुतळे यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट वाचन करणाऱ्या बालवाचकांना सन्मानपत्र, सन्मान चिन्ह ,ग्रंथ भेट व वर्षभरासाठी मराठीतील दर्जेदार बाल मासिक किशोर चे वर्गणीदार करून त्यांचा सन्मान केला. यासाठी कैलास सुरवसे, राजेंद्र शिंदे ,प्रकाश डुबे, दिपाली भावसार, प्रदीप भस्के, अनंता कदम, तळेकर, युवराज माने, मधुकर काष्टे, लक्ष्मण पानझडे ,माणिक हरकळ, रविकांत झटे, विनायक पोळ, शंकर पांचाळ ,शिवाजी भडके , अमित जाधव ,विनोद शेंडगे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.