महसूल व वन विभाग मंत्रालय, मुंबई येथील उप सचिव धनंजय नायक यांनी जिंतूर तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामा बरोबर गावातील शाळा, अंगणवाडी, सिमेंट रस्ते, नाल्या आदी भौतिक सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. शनिवारी (दि.10) जिंतूर तालुक्यातील येलदरी पाटबंधारे प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या गावांना कोणकोणत्या नागरी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत याची पाहणी करण्यासाठी महसूल व वन विभाग मंत्रालय, मुंबई येथील उप सचिव धनंजय नायक यांनी जिंतूर तालुक्यातील बामणी आणि आंबरवाडी या गावांना भेटी देऊन गावातील नाल्या, सिमेंट रस्ते, शाळा, अंगणवाडी, जल जीवन मिशन अंतर्गत नळ योजना अशा सर्व भौतिक सुविधांची पाहणी केली. यावेळी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ताटे, महसूल व पुनर्वसनचे उप जिल्हाधिकारी शिंदे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर यंबडवार, नायब तहसीलदार गौड, उप अभियंता घुगे, अभियंता आष्टीकर, पाठक, बार्शीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब घुगे, माजी सरपंच राजेभाऊ घुगे, माधवराव घुगे, तलाठी यांच्यासह गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी उप सचिव नायक यांनी बामणी व आंबरवाडी गावांची पाहणी करतांना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागा अंतर्गत जल जीवन मिशन कामाचे नियोजन तसेच जिल्हा शेष निधी अंतर्गत पाणी पुरवठा व बांधकामाची पाहणी केली. जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या पाणी पुरवठा योजना कामाचे कौतुक यावेळी उप सचिव धनंजय नायक यांनी केले.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं