पालम : येथील माधवराव पाटील महाविद्यालयात 8 सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता दोहे - संत कबीर मराठी अनुवाद, या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. याच महाविद्यालयातील प्रा. डॉ. कालिदास गुडदे यांनी या ग्रंथाचे लिखाण केले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हरिभाऊ सातपुते होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा.डॉ. आत्माराम आरसुळे, प्रा.डॉ. संजय गडपायले, प्रा.डॉ. संजय बालाघाटे, प्रा.डॉ. नानासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत. प्राचार्य डॉ. सातपुते यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले. या प्रसंगी डॉ. गडपायले म्हणाले की, डॉ. गुडदे यांनी हिंदीतील ग्रंथ आनुवादाच्या माध्यातून मराठीत आणला. त्यांनी जनसामान्यांना कळेल, असे ज्ञान उपलब्ध करून दिले. ते खूप आवश्यक होते. कारण संत कबीर यांनी मानवतावादी विचार मांडले आहेत. त्यांनी अंधश्रेध्वर कडाडून हल्ला केला आहे. म्हणून त्यांचे विचार या ग्रंथाच्या माध्यमातून सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहचतील, असा विश्वास डॉ. गडपायले यांनी व्यक्त केला. दरम्यान, डॉ. गुडदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. संजय बालाघाटे तर आभार प्रा. बी.एस. पवार यांनी मानले.

ः पालम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात प्रा.डॉ. कालिदास गुडदे यांच्या दोहे - संत कबीर मराठी अनुवाद, या ग्रंथाचे प्रकाशन करताना प्राचार्य डॉ. हरिभाऊ सातपुते. समवेत प्रा.डॉ. आत्माराम आरसुळे, प्रा.डॉ. संजय गडपायले, प्रा.डॉ. संजय बालाघाटे, प्रा.डॉ. नानासाहेब पाटील आदी.