हिंगोली प्रतिनिधी/गोपाल सातपुते
12 सप्टेंबर रोजी हिंगोली येथे आयोजित शिवसेनेचा मेळावा हा ऐतिहासिक मेळावा करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे यांनी आज पूर्व तयारी निमित्त आयोजित बैठकीत केले. या वेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
शिवसेना नेते विनायक राऊत, भास्कर जाधव व संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 12 सप्टेंबर रोजी हिंगोली येथे भव्य शिवसैनिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या तयारीच्या अनुषंगाने आज शासकीय विश्रामगृहावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यास 10 हजार शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस हिंगोली जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे, संदेश देशमुख (जिल्हाप्रमुख), माजी आमदार संतोष टारफे, अजित मगर, रमेश शिंदे (लोकसभा संपर्कप्रमुख), उद्धवराव गायकवाड (विधानसभा संघटक), परमेश्वर मांडगे (उपजिल्हाप्रमुख हिंगोली), एडवोकेट रवी शिंदे, बाळासाहेब मगर, शिवा शिंदे (युवा सेना जिल्हाप्रमुख), गणेश शिंदे, पंढरीनाथ ढाले, शंकर घुगे, आनंदराव जगताप आदी उपस्थित होते.
दरम्यान मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने शिवसैनिक उपस्थित राहण्याबाबत नियोजन करण्यात आले.